
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- दि:२७/०२/२०२२रोजी जि.प.शाळा धसवाडी ता.अहमदपुर जि. लातूर येथे आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी अधिनस्त मौजे धसवाडी येथील राष्ट्रीय पोलीओ मोहीम बूथ क्र.१५ च्या लसीकरण केंद्र येथे सेवा निवृत्त औषध निर्माण अधिकारी तथा म.गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष धसवाडी येथील श्री नारायण दिगंबरराव दुर्गे यांच्या हस्ते 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लसीकरण करून उद्घघाटन करण्यात आले.
धसवाडी बूथ क्र.१५ येथे ऐकून २७०बालकांचे पोलिओ लसीकरण झाले याप्रसंगी धसवाडी येथील प्रेमचंद दिगंबरराव दुर्गे सरपंच ग्राम पंचायत धसवाडी , अंगणवाडी सेविका श्रीमती अयोध्या ताई कामखेडकर,श्रीमती सुरसे बी बी ,आशा स्वयंसेविका सौ.सुरेखा पांचाळ यांनी बूथवर कामाची सुरुवात केली आहे.याप्रसंगी आरोग्य सेवक श्री दराडे, राठोड रमेश (दैनिक चालू वार्ता प्रत्रकार) उपस्थित होते,अनेक लाभार्थी व त्यांचे पालक लसीकरणाच्या लाभ घेत आहेत.
या पोलिओ लसीकरण बूथ वर सर्व कर्मचारी व उपस्थित पालक यांनी हात धुऊन व सॅनिटायझर यांचा वापर करुन लस दिली जात आहे.लसीची शीतसाखळी योग्य राहील याची खबरदारी घेतली जात आहे.लसीकरण १००% होईल असा प्रयत्न केला जात आहे. तशेच राष्ट्रीय पोलिओ मोहीम निमित्ताने आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी ता.अहमदपूर जि. लातूर येथे जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष श्री.माधवराव जाधव यांनी 5 वर्षाच्या आतील बालकांना लस देवून उद्घाटन केले.
याप्रसंगी सरपंच श्री अशोक मोरे, उपसरपंच श्री. गिरीधर पौळ, सदस्य, ग्रामस्थ .समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कुंभार ,आरोग्य सेविका सौ ठाकूर, आरोग्य सेवक श्री. दराडे , आशा कार्यकर्त्या सौ काळे सौ. दोरवे सौ बोबडे,अंगणवाडी सेविका गायकवाड, लामतुरे आदींनी मान्यवरांचे हस्ते लसीकरण प्रारंभ करण्यात आला.
तसेच मौजे धसवाडी ,खरकाडी तांडा, नाईक नगर, सेवा तांडा, वंजारवाडी आदी ठिकाणी संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच,सदस्य,पत्रकार आदींनी मान्यवरांचे हस्ते लसीकरण प्रारंभ करण्यात आला.आज एकूण 530 बालकांना पोलिओ लसीकरण देण्यात आले.