
दैनिक चालु वार्ता
उस्मानाबाद प्रतिनिधी
नवनाथ यादव
उस्मानाबाद :- राज्य राखीव पोलीस गट क्र १० सोलापूर येथे पोलीस अधिकारी सत्यधर जगदाळे १९८७ रोजी भारती होऊन त्यांनी तिथे १५ वर्ष सेवा केली. त्या नंतर त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद,मुरूम, तुळजापुर या पोलीस ठाणे येथे गुन्हे शाखा, महामार्ग पोलिस,या ठिकाणी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत त्यांना २०२० रोजी सहाय्यक पोलीस फौजदार या पदी पदोन्नती भेटून तुळजापूर येथे रूजू झाले.
पोलीस सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी,३४ वर्ष ६ महिने देश सेवा करत या कालावधी मध्ये त्यांना उत्कृष्ट कामगिरी म्हणून ११५ पारितोषिके (बक्षिसे) देऊन गौरव करण्यात आला.पोलीस अधिकारी जगदाळे साहेब हे पोलीस सेवेतून निवृत्त बद्दल त्यांना त्यांचे सहकारी,सहपरिवार, मित्र, नातेवाईक व पत्रकार बांधव ,अधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.