
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
राम पाटील क्षीरसागर
लोहा :- लोहा येथील प्रयोगशील शेतकरी तथा बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक केशव शेटे यांनी नाशिक -लासलगावच्या धर्तीवर तो पॅटर्न राबवून लोहयात दोन एकर जमीनी मध्ये पिकविली कांद्याची शेती. लोहा येथील केशव शेटे हे बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक आहेत तसेच त्यांना जुना लोहा येथे वडिलोपार्जित १५ एकर शेत जमिन आहे ते उच्च शिक्षीत आहेत नौकरी करीतच त्यांनी आपल्या शेतात नेहमी विविध प्रयोग करून आधुनिक पध्दतीने शेती करतात.
यात ऊस, हळद,आंबा ,मका , कांदा , भाजीपाला आदी पिके ते आपल्या शेतात घेतात. यंदा त्यांनी दोन एकर शेत जमिनी मध्ये नाशिक-लासलगावच्या धर्तीवर आधुनिक पध्दतीने कांदा या पिकाची लागवड केली आहे. यावेळी त्यांनी कांदा या पिकाला सेंद्रिय खताचा मात्रा देऊन जमिनीची योग्य मशागत करून योग्य वेळी पाणी देऊन निंधन-खुरपन करून मोठ्या प्रमाणात परिश्रम करून कांद्याची शेती उत्तमरित्या फुलवली असुन यंदा कांद्याला भाव ही चांगला असुन अंदाजित २ लाखांच्या वर उत्पन्न या कांदा पिकातून होईल असे प्रयोगशील शेतकरी केशव शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी लोहा येथील पत्रकार विलास सावळे, पत्रकार संजय कहाळेकर, प्रा. रब्बानी मियासाब शेख, विनोद महाबळे यांनी थेट बांधावर जाऊन प्रयोगशील शेतकरी केशव शेटे यांच्या कांदा या पिकाची पाहणी केली व केशव शेटे यांचे अभिनंदन केले.