
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
प्रा अंगद कांबळे
म्हसळा :- म्हसळा तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढिवण्यासाठी सर्वानी योगदान दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनाआजच्या स्पर्धात्मक वातावरणात सामोरे जाण्यासाठी उच्चगुणवतेची गरज असते असे प्रतिपादन नगरसेवक डॉ मोईज शेख यांनी केले न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन समारंभात ते बोलत होते या प्रसंगी म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष व निर्वाचित सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी म्हसळा हिंदू समाज अध्यक्ष सुभाष करडे होते तर प्रमुख पाहुणे तहसीलदार घारे साहेब हे होते.
नगराध्यक्ष असहल कादरी यांनी विद्यालयाच्या गुणवतेचे कौतुक करून सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही दिली प्रमुख पाहुणे तहसीलदार मा समीर घारे साहेब यांनी मौलिक मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्वाची असते तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाची माहिती व मदत करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे केंद्र सुरु करण्यात येईल स्कुल कमेटी चेअरमन समीर बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य प्रभाकर मोरे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना सांगून विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे समाजात. शिवसेना तालुका प्रमुख श्री सुरेश कुडेकर या प्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष करडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले शालेय जीवनातील संस्कार व्यक्तिमत्वाला आवश्यक असतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन प्रगती साठी सातत्त्याने प्रयत्न केले जात आहे असे गौरउदगार काढले सूत्रसंचलन प्रा. चक्रधर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा शेख, प्रा. सौ देवगावकर व सहकार्यांनी केले या प्रसंगी पालक ग्रामस्थ विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.