
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
वाडेपुरी :- मराठा आरक्षणासाहित प्रलंबीत मागण्यांसाठी रयतेचे राजे युवराज छत्रपती संभाजी राजे हे आझाद मैदानात आमरण उपोषणास बसले त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथिल युवक दत्ता पाटील हडसनिकर यांनी सुद्धा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांचे हदगाव येथे पंक्चर काढण्याचे दुकान आहे ते मुंबई येथे जाऊ शकत नाहित म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर नांदेड या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.
दोन दिवसानंतर त्यांची तब्येत खालावली त्यामुळे त्यांना शासकीय दवाखान्यात त्यांना ऍडमिट केले असता युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनीत्यांची भेट घेतली व दत्ता पाटील यांना धीर दिला आणि आधाराचे शब्द बोलून त्यांना तब्येतीची काळजी घ्याअसे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉक्टर भोसीकर साहेब यांच्यासोबत दत्ता पाटील हडसणी कर यांच्या तब्येतीची विचारपूस केली, सोबत उपस्थित संदीप पाटील चिखलीकर, प्रताप जोगदंड ,संतोष कदम , गोपाल जाजू ,बालाजी शिरसागर श्याम गावंडे, उपस्थित होते.