
दैनिक चालु वार्ता
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर :- आनंद निकेतन महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रा तर्फे “स्पर्धा परीक्षांची तयारी व नियोजन ” या विषयावर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुरेपूर ओळख व्हावी करिता , मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा. अरविंद ढोके (विभागप्रमुख ,इतिहास विभाग , आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा ) प्रमुख वक्ते म्हणून लाभले. डॉ. मृणाल काळे यांनी अध्यक्षीय स्थान भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली व मनोगत व्यक्त केले.
प्रा. ढोके यांनी अतिशय समर्पक भाषेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बारकावे समजावून सांगितले , स्पर्धा परीक्षांची तयारी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपायही सुचविले. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला पाहायला मिळाला. दोनशे च्या वर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्पर्धा परीक्षेचे महत्व समजून घेतले .
कार्यक्रमाचे संचालन कु. प्राजक्ता किन्नाके हिने केले व कार्यक्रमाचे आभार कु. कोमल मिलमिले हिने केली . प्रा. तिलक ढोबळे व प्रा. हेमंत परचाके यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पडली.