
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधि
मारोती कदम
लोहा :- मराठा समाजाच्या आरक्षण मान्य होण्यासाठी छत्रपती संभाजीराजे हे महाल सोडून सर्वसामान्य जनतेसाठी आझाद मैदान येथे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत, त्यांची तब्येत खालावली आहे त्यांची बीपी व शुगर कमी झालेली आहे .एक महान असा मराठा समाजातील नेता ज्यांच्या पुर्वजामुळे आपण पोट भर जेवण करतो आहोत स्वातंत्र्यातआहोत आज आपल्यासाठी त्यांच्या मुलाना वंशजांना उपाशी राहून आझाद मैदानावर आंदोलन करावे लागत आहे.
छत्रपती संभाजी राजे यांच्या ह्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून लोहा तालुक्यातील मराठा समाजातील सर्व युवक कार्यकर्ते एका विचारधारेने प्रेरित झाले व एकत्रित येऊन त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज लोहा येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणास समर्थनार्थ शीर्षासन आंदोलन आयोजित केले या ठिकाणी सर्व सकल मराठा बांधव यांच्या उपस्थितीत श्री प्रदीप चव्हाण सर यांनी शीर्षासन करुन संभाजीराजे यांच्या उपोषणास समर्थन दिले.
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे,अशा घोषणाही दिल्या.या वेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,सुधाकर पाटील पवार, सूर्यकांत पाटील गायकवाड, भानुदास पाटील पवार उपसरपंच मस्की,ऋषिकेश पाटील जोगदंड सर बाळू पाटील पवार, अनेक युवक कार्यकर्ते शीर्षासन आंदोलनाला उपस्थित होते लवकरात लवकर छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण ह्या सरकारने थांबवावे व आरक्षणाचा मार्ग काढावा छत्रपती संभाजी राजे यांच्या मागण्या मंजूर कराव्यात असे मराठा समाजातील सर्व स्तरातून भावना व्यक्त होतांना दिसून येत आहेत.