
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.28 महिलांचे प्रत्येक क्षेत्रात सबलीकरण व्हावे , महिलांना सुद्धा पुरुषाबरोबर प्रत्येक क्षेत्रात स्थान उपलब्ध व्हावे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे. पुर्वापार विचारधारा ध्येय धोरण असून माजी पंत प्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी या अगोदरच महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात निम्मे 50% संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, तेच ध्येय धोरण काँग्रेस पक्ष आजही राबवित आहे, असे प्रतिपादन मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय राजेश भाऊ ऐकडे यांनी केल.
नांदुरा तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने नांदुरा येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधुन 26 फ्रेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या वतीने महिला मेळावा तसेच नवनिर्वाचित महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांचा सत्कार व नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी महिला मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार राजेश भाऊ एकडे बोलत होते, यावेळी महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा माननीय, सौ मंगलाताई सुभाषराव पाटील होत्या.
तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव माननीय डॉ, सौ स्वातीताई वाकेकर, प्रदेश महिला काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्या सौ अड , ज्योती ताई ढोकणे, सौ, उज्वलाताई खडसान पाटील, शेगांव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ, सविता ताई झाडोकार, जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्या सौ आशाताई कळसकर गोंड प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सचिव सौ सूनीताताई देशमुख , नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा, भगवान भाऊ धांडे नांदुरा प,स, सदस्या सौ, निताताई धांडे नांदुरा तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष्या सौ ज्योती ताई रविंद्र होनाळे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ, जयश्रीताई बोर्डे, उपस्थित होत्या तसेच तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या , यावेळी नांदुरा तालुका महिला काँग्रेस कमिटी कार्यकारिणी गठित करण्यात आली, व नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ, सौ, अलकाताई मानकर यांनी केले, यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील डॉ सौ स्वातीताई वाकेकर, अड सौ ज्योती ताई ढोकणे, सौ उज्वला ताई पाटील यांनी आपले मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रा, प्रशांत जी बोर्डे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ आशाताई कळसकर गोंड यांनी केले.