
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- ता.२९ मंठा तालुक्यातील नगरपंचायतच्या निवडणुका नुकत्याच डिसेंबर २०२१ मध्ये पार पडल्या असून त्यामध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक व युवासेना उपजिल्हाप्रमुख जालना श्री दिपक आसारामजी बोराडे यांनी आपल्या वार्डातील नागरिकांची गैरसोय किंवा सामान्य नागरिकांचे प्रश्न वंचित राहू नये यासाठी वार्ड क्र.५ मध्ये जनसेवक संपर्क कार्यालय सुरु केले आहे या कार्यालयाचा उदघाट्न सोहळा थाटामाटात पार पडला. कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे जालना जिल्हाप्रमुख ए,जे, पाटील बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांस उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख अजय अवचार, नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे नगरपंचायत सभापती व उपनगराध्यक्ष जे,के, कुरेशी, नगरसेवक प्रल्हादराव बोराडे, विकास सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, संतोष वरकड, हरिभाऊ चव्हाण व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी बोलतांना ए,जे बोराडे म्हणाले कि, वार्ड क्र, ५ मधील जनतेचे प्रश्न नगरसेवकांपर्यंत पोहचवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये.
यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सदैव जनतेच्या सेवेत राहतील मंठावासियांनी शिवसेनेवर विश्वास ठेऊन नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता दिली त्याबद्दल सर्व मतदारांचा आभारी आहे मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी बोराडे यांनी दिले. दिपक बोराडे यांनी वार्डात संपर्क कार्यालय चालू करून एक अनोखा उपक्रम केला आहे त्याबद्दल त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.