
दैनिक चालु वार्ता
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी :- कुरुंदवाडी ता. आटपाडी येथील कराड पंढरपूर महामार्ग ते चवरे वस्तीकडे जाणार रस्ता आमदार निधीतून मंजूर झाला आहे. परंतु येथील 26 शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत,रास्ता सरहद्दीवरून 5 फुटाचा करण्यास शेतकऱ्यांची सहमती आहे तर 10 फूट रास्ता करण्यास विरोध आहे. 10 फूट रस्ता होऊ नये तर 5 फुटाचा रास्ता सरहद्दीवरून व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी कुरुंदवाडी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देऊन विष प्राशन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चवरे वस्ती कडून येणार कराड पंढरपूर महामार्गाला जोडणारा रस्ता हा शेतकर्यांच्या जमिनीतून जात आहे. यापूर्वी बैलगाडी येण्या जाण्या पुरता रस्ता होता त्या रस्त्यातूनच वाहने ये-जा करतात. रस्ता पाच फुटाचा सरहद्दीवरून व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तो रस्ता दहा फुटाचा करावयाचा असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.
तर ग्रामपंचायतने कोणतीही कागदपत्रे देऊ नयेत, यासाठी 26 शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे विषप्राशन करणार असल्याचे तक्रारी अर्जाद्वारे कळविले आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी तहसीलदार आटपाडी, प्रांत खानापूर विटा,उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आटपाडी यांच्याकडे लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. 1999 रोजी तहसीलदार आटपाडी यांनी सरहद्दीवरून 5 फुटाचा रस्ता काढण्याचा आदेश दिला आहे. तर उपविभागीय अधिकारी खानापूर विटा यांनी 09 /06/ 2000 रोजी 5 फुटाचा रस्ता काढण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाप्रमाणे रस्ता व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे,
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दहा फुटाचा रस्ता काढण्याचा प्रयत्न केला . व सार्वजनिक बांधकाम विभागास ग्रामपंचायत ने कोणतीही कागदपत्रे दिल्यास आम्ही विषप्राशन करू असा इशारा 26 शेतकऱ्यांनच्या सहीचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला आहे. रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. परंतु शेतकऱ्यांचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायत कडे आला आहे. शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्रित येऊन शेतकऱ्याचे समाधान झाल्यास संबंधित कार्यालयाला लागणारी कागदपत्रे देण्यास काही हरकत नाही.
– सरपंच सविता वगरे (ग्रामपंचायत कुरुंदवाडी)