दैनिक चालू वार्ता
पंढरपूर ग्रामीण
सुधीर आंद
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम काका साठे यांनी तुंगत ग्रामपंचायत येथे विकासकामांचा आढावा घेण्यासाठी धावती भेट दिली. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणारे युवा नेते मा स्वप्नील रणदिवे
यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या सर्व कामांचे कौतुक करून अशी तरुण मुले राजकारण व समाजकारण यामध्ये सक्रिय व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली व येणाऱ्या काळात युवक नेते स्वप्नील रणदिवे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीर पणे उभी राहील अशी ग्वाही दिली यावेळी उपस्थीत तुंगत गावचे सरपंच आगतराव रणदिवे, उपसरपंच पंकज लामकाने, माजी सरपंच अमित साळुंखे,पोलीस पाटिल पंडित देठे, मा संचालक कालिदास भाऊ रणदिवे, जेष्ठ नागरिक अरुण आण्णा रणदिवे, बाळासाहेब आंद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.