
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे. रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. रामदास यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे ते योग्य नाही. परंतु, रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.