
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
वातावरणातील बदलांमुळे घरात साठविलेल्या धान्याला अनेकदा कीड लागते.. कधी तर धान्याला लागलेले हे कीडे घरभर फिरू लागतात नि घरात राहणं मुश्किल होतं. असं खराब झालेलं धान्य फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. घरात साठवलेल्या धान्याला, पिठाला कीड लागू नये, यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.. चला तर याबाबत जाणून घेऊ या.
कडुलिंबाची पाने :- घरात धान्य साठवण्यापूर्वी पेटी नीट धुवून उन्हात वाळवावी. चांगली सुकल्यावर पेटीत कडुलिंबाची पाने टाका. त्यामुळे धान्यात किडे वाढत नाहीत. धान्यात किडे असल्यास ते मरतात.
लाल मिरची :- पिठात किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण लाल मिरचीचा वापर करता येतो. पिठात लाल तिखट ठेवल्याने त्यात किडे पडत नाहीत. पीठ खराबही होत नाही. शिवाय पिठात मीठ टाकूनही ठेवू शकता.
काडेपेटीचा वापर :- घरातील डाळींचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यात काडेपेटीतील काड्या ठेवू शकता. काड्यांमध्ये सल्फर लावलेले असते.. त्यामुळे डाळी वा धान्याला लागणारे कीडे मरतात व धान्य सुरक्षित राहते.
टीप : वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ‘ दैनिक त्याची हमी देत नाही.