
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिर वेरूळमधील श्री. विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात साकारले जात आहे. प्रत्यक्षात ६० फुटाचे शिवलिंग प्रतिकृतीचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तब्बल २३ वर्षांपासून सुरू असलेले मंदिराचे काम पूर्ण झाले असून १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर ते भाविकांसाठी खुले होणार आहे.
वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या महामार्गावर श्री विश्वकर्मा तीर्थधाम संस्था असून या ठिकाणी भगवान श्री विश्वकर्माचे मंदिर आहे. या परिसरात बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे काम सुरू आहे. मंदिराचा परिसर १०८ बाय १०८ फूट आकाराचा आहे. जमिनीपासून शिवलिंगाची उंची ६० फूट, तर मंदिराच्या छतापासून ४० फूट आहे. शाळुंका ३८ फूट रूंद आहे. पावसाळ्यात पिंडींवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य नयनरम्य ठरेल. पिंडीसह संपूर्ण मंदिराचा रंग काळा आहे.