दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.1 मा. ना. डॉ. नितीन राऊत ऊर्जा कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा बुलढाणा जिल्ह्यात झंझावती दौरा झाला. खामगाव येथे दोन वाजता आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण, त्यानंतर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ कार्यक्रम, त्यानंतर विद्युत भवन धरण गाव येथे उपकेंद्र चा उद्घाटन कार्यक्रम, त्यानंतर श्री धनंजय बाप्पू देशमुख प्रदेश सचिव व श्री गौतम गवळी यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ कार्यक्रम, नंतर उद्री कडे रवाना, उंद्री ते दोन कोटी पन्नास लाख ची पाणी पुरवठा योजनेचे योजनेचे भूमिपूजन,व सरपंच श्री प्रदीप अंभोरे यांच्या धम्म परिषद कार्यक्रमास उपस्थिती, त्यानंतर चिखली येथे माननीय आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रे यांच्या वतीने सत्कार समारंभ व तिथून लोणार कडे रवाना.
हिवरा आश्रम येथील सुकदास जी महाराज मंदिर येथे स्वागत, या संपूर्ण कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार राहुल जी बोंद्रे, मलकापूर विधानसभा क्षेत्र आमदार राजू भाऊ एकडे, मा. आमदार हर्षवर्धन सपकाळ, माननीय आमदार दिलीप कुमार सानंदा, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश सचिव धनंजय बाप्पू देशमुख, प्रदेश सचिव हाजी दादू शेठ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मनीषाताई पवार, सौ स्वाती ताई वाकेकर, श्री लक्ष्मणराव घुमरे, श्री विष्णू जी पाटील, चिखली तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, वसीम कुरेशी,व जिल्ह्यातील तोलामोलाची मंडळी उपस्थित होती. बीजेपी सरकारवर कडाडून टीका ना. डॉ. नितीन राऊत यांनी केली. तसेच धम्मपरिषद मधे प्रदेश सरचिटणीस शाम भाऊ उमाळकर, राहुल भाऊ बोंद्रे यांचे प्रबोधनपर भाषण झाले.