दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई अधिनस्थ शेतीशाळा प्रशिक्षकांना शेतीशाळा वर्गाच्या प्रक्षेत्रावरील पिकाची उत्पादकता ठरवण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण पळसखेडा येथे देण्यात आले. पीक कापणी प्रयोगाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे, प्रताप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुखकृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत निवडण्यात आलेल्या शेतीशाळा चर्गाच्या प्रक्षेत्रावर हे प्रात्यक्षिक पार पडले. उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी पीक कापणी प्रयोगासाठी प्लॉटची निवड करणे, प्रयोगाची कार्यपद्धती, प्रमुख उद्देश, प्लॉटची मोजमापे, आवश्यक साहित्य, प्रयोगासाठी प्लॉट टाकण्याची पद्धत, पीक कापणी मळणी करतेवेळेस घ्यावयाची काळजी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.