
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनीधी
दिपक काकरा
जव्हार :- तालुक्यातील ५ मार्च पासून आपली विविध मागण्यासाठी होणारा ग्रामरोजगार सेवकांचा संप बहुजन विकास आघाडीच्या पुढाकाराने काल जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची भेट घेऊन अखेर टाळला.या भेटी वेळी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका पदाधिकारी आणि ग्रामरोजगार संघटना जव्हार तालुका यांनी एकत्रित गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन एन होळीच्या सणात होणारा हा संप ग्रामरोजगार तालुका संघटनेने अखेर मागे घेतला.
या संपाचा मोठा परिणाम जव्हार तालुक्यातील गोरगरीब आदिवासी जनतेवर होणारा होता परंतु योग्य वेळी सकारात्मक चर्चा व निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे आजपासून रोजगार सेवकांना मस्टर काढण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.म्हणून सर्व जव्हार तालुक्यातील रोजगार सेवक यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना मस्टर काढून गरीब आदिवासी जनतेला काम द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या भेटी दरम्यान जव्हार तालुका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष एकनाथ दरोडा,सल्लागार वसंत दिघा,उपाध्यक्ष नितीन पाटील,सचिव रामचंद्र मौळे,नानू गवळी,युवराज खरपडे,भगवान दरोडा,केशव मोडक,अंकुश दरोडा व कार्यकर्ते आणि जव्हार तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक अध्यक्ष व संघटना यांच्याशी चर्चा करून होणाऱ्या संपला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.