दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
केज: उपजिल्हाधिकारी तथा राज्यसमन्वयक ( जमाबंदी आयुक्त कार्यालय) रामदास जगताप यांनी तलाठ्यांबद्दल असंविधानीक वक्तव्य केल्याबद्दल त्या वक्तव्याचा निषेध करत केज तलाठी संघटनेच्या वतीने केज तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यामध्ये तालुक्यातील सर्व तलाठी सहभागी झाले होते. रामदास जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी केज तलाठी संघटनेच्या वतीने केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांना लेखी निवेदन देऊन तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी तलाठी संघटनेचे अध्यक्ष लव्हू केदार, वर्षा देशमुख, के. बी. देशमुख, सचिव एल. टी. भोर्जे, वैशाली भिसे, बाळकृष्ण तोगे, मंडळ अधिकारी फुलचंद हांगे, भागवत पवार, इनामदार सह अनेक तलाठी व मंडळ अधिकारी या निदर्शने अंदोलनात सहभागी झाले होते.
केज