
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दिनांक 4 मार्च /2022 रोजी PMBJK (प्रधान मंत्री भारतीय जन औषधी केंद्र) कोंढवा खडीमशीन चौक व चंद्रा नर्सिंग होम याच्या तर्फे जन औषधी जनजागरण अभियान गेनबा सोपानराव कॉलेज ऑफ फॉर्मसी वाघोली पुणे इथे शुक्रवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी राबवण्यात आला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ अजय नामदेव हेङ असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ फॉर्मसी कॉलेज भारती विद्यापीठ पुणे. डॉ एम विजयालक्ष्मी (स्त्रीरोग तज्ञ) चंद्रा नर्सिंग होम कोढ़वा पुणे
डाॅ एस. के मुरुड PMBIK जन औषधी केंद्र संस्थापक कोढवा पुणे व हेमानी लेगी मार्केटींग ऑफिसर PMBIK महाराष्ट्र व गोवा. उपस्थित होते. तसेच मोजे कॉलेज ऑफ फॉर्मसीने संस्थापक माननीय रामभाऊ मोजे. प्राचार्य माननीय ओसवाल व मोजे कॉलेज ऑफ फॉर्मसी चे प्राध्यापक वर्ग व यांच्या निदर्शनाखाली विद्यार्थ्याना प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी. केंद्र बद्दल माहिती देण्यात आली. डॉ नामदेव यांनी जेनरीक व ब्रँडेड औषधांमधे फरक नसून जनऔषधींच्या औषधीची गुणवत्ता व परिणाम उत्तम दर्जेचे असल्याची माहीती दीली.
डॉ एम विजयालक्ष्मी स्त्रीरोग तज्ञ यांनी महिला आरोग्या बद्दल माहिती दिली. स्त्रीयांनी दैनंदिन जीवनात नियमीत व्ययाम करावा व पोषक आहार घ्यावे असे सांगितले विशेषतः मासिक पाळीत ठेवण्याची स्वच्छता व त्यासाठी लागणारे sanitory pad हे दिवसातून ३ ते५ वेळा बदलावे. व जनऔषधी च्या Biodegraalabre pad बद्दल माहीती सांगितली. डौं एस के मुरुङ यांनी जनऔषची केंद्र उघडण्याची प्रक्रिया व त्याचे रुग्णानां होणारे फायदे या बद्दल माहिती दिली. जन औषधी मध्ये ब्लड प्रेशर, हृदयविकार, रक्तवाढी औषधे प्रोटिन पावडर इत्यादि कमी किंमतीत उपलब्ध आहे असे सांगितले.
टिप:- जन औषधी जनजागरण अभियान अंतर्गत सर्वसामान्य जनतेला उत्तम गुणवत्तेची कमी दरात औषधी उपलब्धा बद्दल सांगण्यात आले