
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कवी सरकार इंगळी
कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आणि विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय चंदूर आयोजित प्रथमचं चंदूर नगरीत १० वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात महासिद्ध मंदिरच्या प्रांगणात संपन्न झाले. विद्यार्थी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा, डा,कै.पांडूरंग कृष्णा पवार यांचे प्रतिमेजे पुजन करणेत आले. तसेच.संमेलनात सरपंच सौ,अनिता माने यांचे शुभ हस्ते सरस्वतीचे प्रतिमा पुजन करून गंगाखेड पुणे येथील प्रसिद्द समाजसेविका,लेखिका संगीता ताई भाऊसाहेब जामगे यांनी संमेलनाचे उद्घाटन करणेत आले.
यावेळी त्यांनी चंदूर येथील साहित्य संमेलन ,आणि गावचे भरभरून कौतूक केले.इथून पुढे या गावात सतत संमेलन भरवून मराठी भाषा चळवळ अशीच फुलत रहावी अशी अशा व्यक्त केली.त्यांच्या सामाजिक व साहित्य सेवेबद्दल गौरव पत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.प्रास्ताविक सुरेश कुंभार यांनी तर पाहुण्यांचा परिचय कवी सरकार इंगळी यांनी कले.कार्यक्रमास मा,भाऊसो रेंदाळे उपसरपंच,जगोंडा पाटील, रघूनाथ पाटील,आप्पासो पाटील, दशरद मलकापूरे वगावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
संमेलन अध्यक्ष मा प्रा,किसनराव कुऱ्हाडे, यांनी आपल्या भाषणात,चंदूर येथील साहित्य प्रथमचं संमेलनह हे मराठी भाषेसाठी एतिहासिक असेल असे सांगून मराठी भाषा स़मेलनांच्या माध्यमातून गावागावांत रुजली पाहिजे असे सांगितले.जगात आपली भाषा हि ९ क्रमांकाने बोलली जाते , हि आपली मातृभाषा आपण ग्रामीण भागात संमेलनाचे माध्यमातून जपली पाहिजे.शिक्षण घेताना प्रथम मराठीचे जतन करून जगाच्या पाठीवर इतर भाषांचा वापर करायला हरकत नाही असे सांगितले.
संमेलनात कथाकथनकार प्रा,शांतीनाथ मांगले बलवडी यांनी ग्रामीण ढंगातील कथा कथन करून रसिंकाची मने जिंकली.
परिस़ंवादामध्ये प्रसिद्द लेखक डा श्रीकांत पाटील सर,मा,मनोहर भोसले ,सिराज शिकलगार यांनी मी आणि माझी ग्रंथसंपदा यावर मनोगत व्यक्त करून साहित्यक तयार व्हावेत आणि तळागाळापर्यंत घडणाऱ्या सामाजिक ,शिक्षण गोरगरिबांचे, अन्याय,अशा घटकांचे वास्तव पुस्तक रूपाने मांडण्याचा माणस ठेवावा असे सांगितले. संमेलनात साहित्य सेवा,विविध वाडमय प्रकारातील साहित्यकृतींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यात डा,श्रीकांत पाटील,, मनोहर भोसले, प्रा,डा सुरेश कुराडे सर,डा,विजय माने,रमजान मुल्ला,मुख्याध्यापक, पां,आ.व्हरगर ,सुर्यकांत पालीमकर पंढरपूर,पत्रकार सुरेश कुंभार चंदूर पत्रकार प्रशांत भोसले,,सुनिल इनामदार सर,वैशाली पाटील कोल्हापूर, दुपारच्या सत्रात सौ,श्लेषा कांरडे सांगोला यांचे अध्यक्षखाली बहारदार कविसंमेलन झाले.यात कवी, मधूकर हुजरे उस्मानाबाद, अशोक पवार कडेगांव,सौ,आरती लाटणे,पल्लवी ढवळे,इंचलकरंजी, सारिका पाटील,, सात्तापा सुतार,रशिद तहशिलदार ऋजुता माने अनिता खेबूडकर,मा लक्ष्मन्ण मलकापूरे चंदूर,शाहिर विजय शिंदे कोल्हापूर, ,गीतकार दस्तगीर नदाफ, बळीराम कदम, धोंडीराम मिठारी,तातोबा कांबळे, विलास कांबळे,चंद्रकांत देसाई, मनोहर भोसले प्रा,डा,सुरेश कुऱ्हाडे, पत्रकार प्रशांत भोसले, आधी ५० सहभाग कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
सुत्रसंचालन सौ,संगीता पाटील, प्रा,रघुनाथ शिरढोणे,बाबा जाधव रूई यांनी केले. आयोजक मा,कवि सरकार इंगळी, चंदूरचे विजयकुमार पाटील, रविद्र झेले,विठोबा पाटील,प्रविण पाटील, संदीप कुंभार,प्रमोद चौगुले ववाचनालयाचे सर्व संचालक मंडळ यांनी विषेश योगदान दिले आहे .अशी माहिती कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्दीस दिली आहे.