
दैनिक चालु वार्ता,
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त लोहा तालुक्यातील मौजे सोनमांजरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत सोनमांजरी’ येथे डॉक्टर श्रीनिवास सोपानराव लोंढे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रक्तदाब, रक्तगट,कान, जेम नाक, घसा, डोळे याची तपासणी करण्यात आली .
यावेळी डॉ. डी बी कानवटे , डॉ.समीर कोटलवार डॉ. विवेक बोरलेपवार , डॉ. दिनेश सूर्यवंशी डॉ,. अविनाश चव्हाण या सर्व डॉक्टरांनी ३५० जणाची मोफत आरोग्य तपासणी केली .
यावेळी प्रथम छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचे डॉक्टर मंडळीचे व्यंकटराव पाटील लोंढे पोलीस पाटील व सरपंच सखाराम पाटील लोंढे यांनी सत्कार केला. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल लोंढे यांनी परीश्रम घेतले .