
दैनिक चालु वार्ता
अजय चव्हाण प्रतिनिधी
वानोळा येथे धन निरंकार अध्यात्मिक जनजागृती अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य वक्ता म्हणून डोंबिवली, मुंबई चे वक्ते श्री. देविदास खेमसिंग चव्हाण यांनी सामाजिक प्रबोधन केले, या वेळी दारू, जुगार ई. व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे, अध्यात्मिक मार्गाकडे वळावे, व आपले जीवन आनंदमय,सुखमय करावे असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले. धन निरंकार मिशन अंतर्गत किनवट माहूर परिसरातील अनेक गावात समाज प्रबोधन सुरू असून अनेक लोकांना व्यसनापासून परावृत्त केले आहे.
आगामी काळात सुध्दा असेच प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन श्री.देविदास चव्हाण यांनी केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तारासिग चव्हाण, सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक प्रकाश जाधव, सवाई राठोड, दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी अजय चव्हाण,तसेच वानोळा, पानोळा, मेंडकी, मुंगशी, पाचुंदा या गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री.इंदल पिराजी राठोड यांनी केले, निलेश राठोड यांच्या वतीने अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला.