
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- येणा-या स्थानीक स्वराज्य निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असुन या माध्यमातुनचं जनतेची कामे करणे शक्य होते. म्हणुन पक्षबळकटीसाठी डीजीटल सदस्य नोंदनीतून तळागाळात काँग्रेस कार्यकर्ता तयार करा. असे आहवन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. दि. ६ मार्च रोजी कॉग्रेसच्या वतिने डिजीटल सदस्य नोदंनी अभियाना परतुर येथे सुरावात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
येथील काँग्रेस संर्पक कार्यालयात आयोजीत या अभियानाला प्रमुख उपस्तीती म्हणुन डिजिटल सदस्य अभियानाचे जालना जिल्हा समन्वयक अण्णासाहेब खंदारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, मंजुळदास सोंळके, लक्ष्मन शिंदे, वैजनाथ बागल, जिल्हा परिषद सदस्य इद्रजित घनवट, नगरसेवक बाबुराव हिवाळे, राजेश खंडेलवाल, राजेश बंड, संतोश दिंडे, अविनाश शहाणे, प्रविण डुकरे, पांडुरंग गाडगे,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्तीती होती.