
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- नगरसेवक परिसरातील विलास कॉलनी येथील संजय नरवणे, नगरसेविका सोनाली करेसिया यांच्या प्रयत्नाने विलासनगर गल्ली क्रमांक सहा येथील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार असून,या कामांचे भुमीपूजन आ.प्रवीण पोटे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी नगरसेविका माधुरी ठाकरे यांच्या निधी अंतर्गत लक्ष्मीनगर येथील विकासकामांचे भूमिपूजन आ.प्रवीण पोटे यांनी केले.त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत नगरसेविका रिता मोकलकर यांच्या वार्डविकास व स्वेच्छा निधी अंतर्गत नवसारी येथील विलास कॉलनी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाले.
नगरसेविका नूतन भुजाडे यांच्या प्रयत्नाने मंजूर श्यामनगर येथील रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा भूमिपूजन सोहळा आ.प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाला. यावेळी महापौर चेतन गावंडे,भाजपा शहराध्यक्षा किरण पातूरकर,सभागृह नेते तुषार भारतीय,उपमहापौर कुसुम साहू,शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर,रवी खांडेकर आदी उपस्थित होते.