
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- ग्रामीण कथा-कादंबरीकार छबूराव भांडवलकर यांच्या बोंडअळी या कादंबरीचे प्रकाशन होते. जेईएस महाविद्यालयाचे डॉ. जवाहरलाल काबरा यांच्या हस्ते करण्यात आले
मराठा क्रांती भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यावेळी प्रा. डॉ. अशोक देशमाने, प्रा. डॉ. कैलास अंभुरे, कवी धोंडोपंत मानवतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थितांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. पांडुरंग नवल, आत्माराम कुटे, कल्याण बागल, दिलीप मगर, डॉ. राम कदम, डॉ. भानुदास कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अरुण भांडवलकर, विश्वनाथ भांडवलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.