
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- काही दिवसांपूर्वी चांदुररेल्वे मतदार संघात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत विविध विकास कामे साकारणारे माजी आ.वीरेंद्र जगताप यांच्या अथक प्रयत्नामुळे मतदार संघाला आणखी ४ कोटी ३६ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. मतदार संघातील चांदुररेल्वे,नांदगाव खंडेश्वर आणि धामणगाव तालुक्यातील विकासकामांचा यात समावेश राहणार आहे. गेल्या २ वर्षात मतदार संघातील शहरातील अनेक रस्ते,नाल्या,खराब झाल्या आहेत. त्याबाबत अनेक तक्रारी,निवेदने प्रा.वीरेंद्र जगताप यांच्याकडे सातत्याने येत होती.
त्यांची दखल घेत चांदुर रेल्वे,नगर परिषदेसाठी रस्ता अनुदान आणि वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत एक कोटीचा निधी प्राप्त करून दिला आहे.तर नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीसाठीही एक कोटीचा निधी प्रा.जगताप यांनी उपलब्ध करून दिला आहे.याशिवाय शासनाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत चांदुररेल्वे,धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वरसाठी २ कोटी ३६ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधी अंतर्गत चांदुररेल्वे शहरामधील जिजामाता कॉलनी,डांगरिपूरा,याशिवाय वसतिगृह कडील रस्ता,शिवाजी नगर मधील नाली बांधकाम,बालाजी मंदिराकडील सिमेंट रस्ता,भगवान चौकातील सिमेंट रस्ता,क्रांती चौक येथील सिमेंट रोड,धनराज नगर परिसरातील रस्ता बांधकाम,बानाईत लेआऊट मधील रस्ता बांधकाम, कारला पेंड येथील रस्ता व नाली बांधकाम आदी बांधकामसह मतदार संघातील तीनही तालुक्यातील महत्वाचे विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला असल्याची माहिती प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या कार्यालयातून मिळाली आहे.
मंत्री महोदयांचे आभार :-
मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांचे गेले दोन वर्षात सर्वसामान्य विकास कामे दुर्लक्षित राहत आहे.त्यांच्या लहान-सहान कामांसाठी त्यांचे निवेदन मला मिळत असतात.सध्या आमदार जरी नसलो तरी सुद्धा काँग्रेसचे शासन असल्याकारणाने विविध विकास कामे खेचून आणता आले आणि त्यासाठी आपला सदैव पाठपुरवठा तसेच प्रयत्न राहील.आपल्या मतदार संघाला विकासकामांसाठी निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे आभारी असल्याचे मत माजी.आमदार वीरेंद्र जगताप यांनी मानले.