
दैनिक चालु वार्ता
सिडको प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
नांदेड :- माळी या नावाची कायमच आपली नाळ जुडलेले अखंड महाराष्ट्रात विखुरलेल्या तमाम माळी बांधवांना एकसंघ करणारे खऱ्या अर्थाने समाजात जनजागृती करून सावता परिषदेच्या माध्यमातून आपल्या समाज कार्याचा झंझावात महाराष्ट्रभर निर्माण करून जनसामान्यांचे असामान्य नेतृत्व असलेले कल्याण काका आखाडे यांचा वाढदिवस सिडको येथे श्री ज्ञानगंगा प्राथमिक शाळा सिडको येथे शालेय विद्यार्थ्यांना एक पेन व एक वही व खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे होते.
तर व्यासपीठावर गोरखनाथ राऊत जिल्हाध्यक्ष सावता परिषद नांदेड, देवीदास कदम, श्रीमती सुभद्रा कदम, प्रा. अशोक
गोणारकर, प्रभु उरुडवड, मुख्याध्यापक श्री जाधव, सौ. मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुनील शिंदे यांनी केले तर कल्याण काका आखाडे यांच्या सामाजिक कार्याविषयी गोरखनाथ राऊत यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात विनोद कांचनगिरे यांनी आखाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.
सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एक पेन एक वही व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शशीकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन. सुनिल शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल शिंदे, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, प्रभु उरुडवड यांच्या सह ई.ने परिश्रम घेतले. या वेळी शाळेतील बहुसंख्य विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.