
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा उत्तर प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
नांदेड: ता 8 :- श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर काँलेज माणिकनगर व कौठा शाखा नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गुरुनाथराव कुरूडे, उपप्राचार्य परशुराम येसलवाड, पर्यवेक्षक सदानंद नळगे व माधव ब्याळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व शिक्षिका व महिला शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कारमुर्ती म्हणून प्रा. स्वाती कान्हेगावकर, प्रा. प्रतिभा जाधव, प्रा. रूपाली कळसकर, प्रा. वैशाली दुलेवाड, प्रा. शेख रेश्मा, प्रा. दीपा जामकर, डॉ. कविता तिर्थे, सौ. विजया कुरुडे, सौ पद्मा वरवंटकर, सौ मोहिनी दिनकर, श्रीमती सुवर्णा कळसे, कामेश्वरी पेठकर, शिल्पा पोले, सुजाता कांबळे, अपर्णा लाडेकर ,संगिता वाकर्डे, अरुणा स्वामी, सुषमा वडवळकर, सपना गरुडकर, संगीता पोकले, दत्ता जाधव, रेहाना पठाण, लक्ष्मीबाई जाधव लताबाई इंगोले ईत्यादी महिलांची covid-19 चे नियम पाळून उपस्थित होत्या.