
दैनिक चालु वार्ता
ठाणे प्रतिनिधी
ठाणे :- ठाण्यातील भंगार गोडाऊनला आज मंगळवारी (ता.आठ) दुपारी आग लागली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ठाणे येथील शिळ फाटा – म्हापे रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागली आहे. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग गोडाऊनला कशामुळे लागली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.