
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
पालघर :- कला व वाणिज्य महाविद्यालय,मोखाडा येथिल प्राणिशास्त्र विभाग व आय,क्यू,ए, सी यांच्या संयुक्त विद्यमाने बी किपिंग एमर्जिंग ट्रेंड्स अँड करियर अपोरचुणीटीज या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन वेबिनर चे आयोजन करण्यात आले होते,
या वेबिनार मध्ये महाराष्ट्रा सह प बंगाल,पंजाब,तेलंगना इ राज्यातील १२० प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते, श्री बिपीन जगताप,उप कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामउद्योग मंडळ,महाराष्ट्र राज्य मुंबई हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.तसेच टी, सी कॉलेज बारामती येथून डॉ विठ्ठल नाळे सर उपस्थित होते.
मोखाडा तालुक्यात मधमाशी पालन व व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वाव असून येथील शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन मधमाशी पालनाचा प्रयोग यशस्वी रित्या राबवावा असे आव्हान बिपीन जगताप यांनी केले तसेच त्यांनी विविध सरकारी योजणांन बाबत विस्तृत माहीती दिली,डॉ विठ्ठल नाळे यांनी मधमाशी पालनातील रोजगाराच्या विविध संधी या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,अध्यक्षीय मनोगत वेक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल डी भोर यांनी विद्यार्थी व उपस्थितांनी मधमाशी पालना बाबत जणजागृती करावी तसेच सरकारी योजनांचा लाभ घेऊन मधमाशी पालनाचा प्रयोग यशस्वी रित्या राबवावा असे आव्हान केले.
या वेबिनार चे प्रास्तविक प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस के पवार यांनी केले, आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक डॉ ए.एल.शेख यांनी केले सदर वेबिनारसाठी उप प्राचार्याय प्रा,एस इ सैदनशिव व आय.क्यू.ए. सी समन्वयक डॉ.ए एन चांदोरे उपस्थित होते, या वेबिनार साठी सहाय्यक प्राध्यापक श्री. किरण पारधी आणि श्री.प्रतीक हवाले यांनी परिश्रम घेतले.