
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका युरोपसह अन्य देशांनी त्यांच्यावर कडक बंधने घातली आहे. या युद्धात रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा या प्रयत्नात आता रशियानेही एक विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये ज्या देशांशी किंवा संस्थांशी रशियाचे मित्रत्वाचे संबंध नाहीत, त्यांची यादी तयार केली आहे. यादीत अमेरिका, ब्रिटन, युक्रेन, जपान आणि युरोपिय समुदायातील २७ सदस्य देशांची नावे आहेत.