
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एव्हिएशन रेग्युलेटरी डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्चपासून भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
यापूर्वी 19 जानेवारी रोजी या विमानांच्या निलंबनाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता विमानसेवा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण आणि कोरोना नियंत्रणात आल्याने आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे भारतात 2 वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी उठवण्यात आली.
नागरिक उड्डयन मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जगात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचं हित लक्षत घेऊन 27 मार्च 2022 पासून विमानसेवेचं समर शेड्युल 2022 सुरू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना लवकरच त्याबाबतच्या गाइडलाईन्सही देण्यात येणार आहेत.