
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कात्रज/ पुणे :- गरवारे कॉलेज स्टेशन ते आनंद मेट्रोचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. याचा आनंद आहे. मात्र, सातत्याने मूलभूत सुविधेसह विकास प्रकल्प निधीबाबत मिळणारी दुय्यम वागणूक व स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा आराखडा तयार असताना मंजुरी विना रखडला असल्याने कात्रजच्या नारिकांमध्ये नाराजी आहे, अशा शब्दांत नमेश बाबर यांनी संताप व्यक्त केला.
पुणे शहरातील विशिष्ट भागाचा विकास होतो.
मात्र तीनपट कर भरणाऱ्या कात्रजच्या वाट्याला केवळ प्रतीक्षाच आहे. याचा निषेध कै. सुदामराव बाबर प्रतिष्ठाण व स्व. अजितदादा बाबर फाउंडेशनच्यावतीने नगरसेविका अमृता बाबर व स्वराज बाबर यांच्या पुढाकाराने प्लॅस्टिकची मेट्रोची प्रतिकृती तयार करून ती संत खेतेश्वर चौकातून बैलगाडीने ओढत आणत विडंबनात्मक आंदोलन करीत करण्यात आला.