
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- आधारभूत किंमत खरेदी योजना २०२१-२२ महाराष्ट्र स्टेट को. ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई चाकूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या चाकूर हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ चाकुर अहमदपुर मतदार संघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी चाकूर ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, यादव सुमठाणे, खरेदी विक्री संघ चेअरमन डॉ. चंद्रप्रकाश नागिमे, व्हा. चेअरमण माजी सभापती राधाकिशनजी तेलंग, नगरसेवक मिलिंद महालिंगे, घरणी सरपंच भानुदासराव पोटे, गंगाधर अप्पा अक्कानवरु , चेअरमन करीम डोंगरे, गणपत आबा कवठे, शिवदर्शन स्वामी , बिलाल पठाण, संदीप शेटे, राम फुले, येडके साहेब, शिरणाळ सरपंच सौ प्रियंका गोणे , दताजी आलमाजी, नवनाथ आवाळे पत्रकार शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.