
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
भोरटेक (मोताळा) :- दि.९ मानवी दुःखाच्या मुळाशी जाऊन बुद्ध धम्म माणसास जीवनाचा आदर्श असा संमेक जीवन मार्ग देतो. तेच धम्म शिक्षण भारतीय बौद्ध महासभा जनतेस देण्याचा गेली साठ सत्तर वर्षे पासून प्रयत्न करत असून धम्म, श्रामनेर शिबिरातून मानवी मन मेंदू चिकित्सक व उद्बबोधित होतो. यानिमित्ताने भोरटेक तालुका मोताळा इथे भव्य श्रामनेर शिबिराचे आयोजन दिनांक 15 मार्च 2022 पासून ते दिनांक 24 मार्च 2022 पर्यंत केलेले असून जास्तीत जास्त धम्म बांधवांनी सहभागी होन्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा मोताळा तालुका अध्यक्ष निवृत्ती एस.वानखडे यांनी केले आहे.
शिबिराचे उद्घाटन एस. एस.वले सर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून के. वाय. सुरवाडे सर उपस्थित राहणार आहे.यानिमित्ताने पु. भंते दीपंकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरात बौद्ध धम्मातील पूजा व इतर बाबीची माहिती दिल्या जाणार आहे. पंचशील ध्वजारोहनाणे या शिबिराचे उद्घाटन होईल. दैनंदिन कार्यक्रमाअंतर्गत धम्मा वंदना व मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी यांच्याशी संपर्क करावा.
निवृत्ती वानखडे ९५११६९२०७८
संगपाल आहिरे ८३९०१६९६७९
निलेश वानखडे ९५८८४२२१०१