
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- रक्तदान हेच जीवनदान – निरोगी व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. विनोद रामटेकर यांना मूत्र पिंडाचा आजार झाला आहे. ते सध्या केएमजे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. उपचार पूर्वी डॉक्टर यांनी शरीरात रक्ताची कमी आहे असे सांगितले. आपणास माहिती आहे रक्ताचे चार प्रकार पण विनोद यांना पाहिजे होते. जगातील अती दुर्मिळ रक्तगट ते पण बॉम्बे ब्लड ग्रुप ( वीस लाख) लोकांच्या मध्ये एखादी व्यक्ती बॉम्बे ब्लड ग्रुप चा आढळतो.
पण बॉम्बे ब्लड ग्रुप डोनर शोधायचा कसा असा प्रश्न पडला तेंव्हा नांदेड येथील माधव मारोतीराव सुवर्णकार यांनी पूर्णा येथील रहिवाशी ओमप्रकाश पंडित सर यांना लगेच संपर्क करून गोंदिया येथील लागणारी बॉम्बे ब्लड ग्रुपची तातडीची गरज आहे हि बातमी कळवताच ओमप्रकाश पंडित सर यांनी हातातील काम सोडून तात्काळ नांदेड गाठले आणि रक्तदान केले. ह्या आगोदर माधव सुवर्णकार व पवन पाटील सांगली हे दोघे पण गोंदिया येथे जाऊन रक्तदान केले होते. गोळवलकर ब्लड बँक येथील शिंदे सर व त्यांची पूर्ण टीम यांचा पण सहभाग लाभला आहे..
नांदेड मध्ये रक्तदाता मित्र नांदेड हा ग्रूप आहे मी पण त्याना मदत करत असतो आणि विशेष म्बणजे माधव सुवर्णकार बरबडेकर यांनी आतापर्यंत 53 वेळा रक्तदान केलं आहे जिथे रक्ताची कमी, तिथे आम्ही हे ब्रीद घेऊन संपूर्ण आमची टिम काम करत असते असे श्री.एन एम तिप्पलवाड सर म्हणाले .तुम्ही आज करा रक्तदान तुम्हाला पुढची पिढि ठेवील तुमचा मान. जसा पाण्याचा थेंब् न थेंब धरणात साठायला हवा, तसा रक्ताचा थेंब् न थेंब रक्तपेढीत साठवायला हवा.
रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. आपण देखील रक्तदान करून एखाद्या गरजवंताची गरज पुर्ण करण्याकरीता पुढे यावं व प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे.