
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- जागतिक महिला दीना निमित्त उप जिल्हा रुग्णालय, देगलूर येथे वै. अधीक्षक डॉ. एस एस वलांडे सर यांच्या मार्गदर्शना खाली महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा पपुलवार मॅडम, प्रमुख पाहुणे वै. अधीक्षक डॉ. एस. एस. वलांडे सर हे होते. ई. सिस्टर मनीषा बोइंनवाड, डॉ. विश्वनाथ मलशेटवार, डॉ. सचिन रावीकर, डॉ. प्रदीप ठकरवाड, डॉ. उत्तम वागतकर, डॉ. मो. उस्मान, डॉ. संजय लाडके,डॉ. मुजीब, डॉ. काझी,श्री गोपाल बिडवई, शिवाजी पवार, प्रवीण येरेवाड, रेणुका धुमाळे, गौसीया मोमीन,मनीषा गोदे,छाया पाटील, बाभळे,ई ची उपस्थिती होती.
या महिला दिनां निमित शिवसेना तालुका प्रमुख श्री महेश पाटील, सचिव धनाजी जोशी,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख राधाताई पटवारी , तालुका अध्यक्षा रेखाताई बोगूलवार, शहर अध्यक्षा अर्चन्ना देशमुख यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व महिला डॉक्टर्स कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ व पेढे देऊन यथोचित सन्मान केला डॉ.या प्रसंगी प्रास्ताविक छाया पाटील यांनी केले.
डॉ. संजय लाडके यांनी आयुर्वेद,योग व जीवनशैली आणी महिलांचे आरोग्य या विषयी मनोगत वेक्त केले.वै. अधीक्षक डॉ. एस. एस. वलांडे सरानी बोलताना कर्मचाऱ्यांनी ताणतणावं न घेता रुग्णाना चांगली सेवा कशी द्यावी व आपलं आरोग्य कसे चांगले राहील या विषयी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा पपुलवार यांनी अधीक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे आभार ई. सिस्टर यांनी आभार मानले.