
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
श्रीनगर :- जम्मू भागातील जिल्हा न्यायालयाच्या संकुलाबाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात एक ठार, सात जण जमखी झाल्याची घटना आज बुधवारी घडली आहे. जम्मू भागातील उधमपूर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या संकुला बाहेर सदरील स्फोट झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या स्फोटा मागील कारण अद्याप ही स्पष्ट झालेले नाही.