
दैनिक चालु वार्ता, वृतसेवा
-मराठी भाषा पुन्हा घराघरात बोलली गेली पाहिजे, ज्ञान, विज्ञान, व्यवहारातली भाषा झाली पाहिजे…
– मराठी भाषेला ज्ञानार्जन, अर्थार्जनाची भाषा बनवून अभिजात भाषेचा दर्जा देणं ही तात्यासाहेबांना आदरांजली उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 10 :- “कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रजां’च्या काव्यप्रतिभेने मराठी भाषा समृद्ध झाली. तात्यासाहेबांच्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानं मराठी भाषेचा गौरव वाढवला. हजारो वर्षांचा गौरवशाली वारसा असलेली आपली मराठी भाषा, पुन्हा एकदा घराघरात बोलली गेली पाहिजे. मराठी भाषा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवहारातली मुख्य भाषा झाली पाहिजे. मराठी भाषेला ज्ञानार्जन, अर्थार्जनाची भाषा बनवून अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं, हीच स्वर्गीय तात्यासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे. स्वर्गीय तात्यासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रजां’च्या कार्याचं स्मरण करुन आदरांजली वाहिली.
०००००००००००