दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड दि. १३ (बातमीदार): राष्ट्रीय काव्यांगण लेखनीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सन २०२१ यावर्षी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक शेख सिराज यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कारांसाठी ऑनलाईन वेबसाईटद्वारेमाहिती सादर करण्यात आली. दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी गुगल मीटद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध कवी डॉ. सुनील पवार, राष्ट्रीय सल्लागार डॉ. निरज आत्राम रास्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक राजु पाडेकर, उपाध्यक्षा सौ. प्रांजली काळबेंडे, महासचिव प्रा. सुहानंद ढोक आदी उपस्थित होते..
केज