
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
माळशिरस :- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी निरोप देऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आले दि. 9 मार्च रोजी दहिगाव हायस्कूल दहिगाव येथे मार्च 2022 या दहावीच्या बॅचचा निरोप समारंभ संपन्न झाला या समारंभासाठी आदरणीय वनिता देवी विठ्ठलराव पाटील संचालिका प्रगत शिक्षण संस्था दहिगाव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दहिगाव हायस्कूल दहिगाव चे मुख्याध्यापक श्री मोरे सर दहावीचे वर्गशिक्षक श्री पवार सर श्री बारवकर सर आणि इतर सर्व शिक्षक स्टाफश्री चव्हाण सर श्री बोबडे सर श्री पाटील सर श्री भुजबळ सर श्री नवगिरे सर श्री राऊत सर श्री धुमाळ सर श्री बुधावले सर श्री राऊत सर श्रीमती पाटील मॅडम श्रीमती भोसले मॅडम श्री फुले सर तसेच दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच श्री बुधावले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी विठ्ठल राव आबासाहेब पाटील यांनी शिक्षण संस्था स्थापन करून कसे सामाजिक कार्य केले याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बारवकर सर आणि माने सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री पवार सर यांनी केले.