
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
बरडी :- महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो.आज महिला चौकटी बाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण,लष्कर,संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे.या कामाची दखल म्हणून ८ मार्च या जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात येतो व स्त्रीयांचा कार्याचा व त्यांच्या कार्य शक्तीचा गौरव या महिला दीना निमित्ताने करण्यात येतो.
या सन्मानाने व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्तीची ओळख सर्व समाजात समानतेने होऊन त्यांच्या प्रेरणेतून महिला व विध्यार्थीनींनी ही या यशस्वी स्रियांनाचा आदर्श घेऊन आपले जीवन तेजस्वी करावे या करीता शासकिय माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय बरडी येथे ही जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणाची प्रेरणा ज्योत व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षक सुनील वसावे यांनी केले व यावेळी उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका पूजा पाडवी व शिक्षिका रोशनी पाडवी यांनी आदर्श महिलांचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याच प्रमाणे मुख्याध्यापक सुरुपसिंग पाडवी यांनी ही संघर्षमय जीवनातून यशस्वी झालेल्या आणि आपल्या हक्कासाठी झगडून अधिकार घेणाऱ्या स्रियांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन करून कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे आभार ही मानले. बरडी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे साजरा केला यात गावांतील महिलांनी आणि विद्यार्थ्यांनींनी आदिवासी ढोलाच्या तालावर आदिवासी नृत्य केले.व एक मेकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात आश्रम शाळेतील कर्मचारी अधिक्षिका ममता मुंजमकर,भारती खर्डे,अधीक्षक संदिप राठोड शिक्षक अंकुश वळवी, अविष वसावे,अशोक वसावे,किसन पाडवी,साजन पाडवी, रमेश राऊत, देवला वसावे,प्रभाकर रामटेके,रमेश वसावे,आपसिंग वसावे आदि उपस्थित होते.त्याच प्रमाणे गांवातील महिला बीजा तडवी,शकुंतला राऊत,आदि उपस्थित होते.