
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
गंगाखेड/ प्रतिनिधी :- मंत्रालयात मध्ये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई येथे उपसचिव विलास थोरात यांची गंगाखेड. विधानसभेचे लोकप्रिय आमदार रत्नाकर रावजी गुट्टे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे प्रलंबित असलेला गुप्तेश्वर मंदिराचा जिर्णोद्धाराचा प्रस्ताव सचीवाकडे सेक्रेटरी व मिनिस्टर यांचेकडे तात्काळ पाठून द्यावा अश्या सूचना केल्या व उपसचिव यांनी आमदार गुट्टे यांना बोलत असताना म्हणाले लगेच उद्या प्रस्ताव सचिवांकडे पाठऊन देतो असे आमदार गुट्टे यांना सांगितले तदनंतर सदरिल प्रस्ताव नियोजन विभागाकडून वित्त विभाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
वित्त विभागाची मान्यता मिळवून सदरील प्रस्तावास मंजुरी देऊन लवकरच गुप्तेश्र्वर मंदिराचा प्रश्न आमदार रत्नाकर गुट्टे माध्यमातून मार्गी लागणार आहे हा गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून यास मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि तात्काळ मंत्री महोदयांसमवेत बैठक लाऊन 21 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासीत आमदार गुट्टे यांनी धारासूर येतील गावाकऱ्यांना केलं. व पुढील बाबीच पाठपुरावाही घेऊन गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मार्गी लावू असे ते म्हणाले.