
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे अनंतपुर,हर्सूल, धामोरी, डोणगाव,रायपूर, लासुरगाव येथील शेतकऱ्यांनी भर पावसात समृद्धी महामार्गावर आंदोलन केले व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अशोक ससाने व शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना लेखी निवेदन देऊन पुन्हा पंधरा दिवसांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा रस्ता वाहतुकीस खुला होणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंतिचे काम चालू असून काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेतमाल खत व शाळकरी मुलांना शेतात जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नसल्याने समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला किमान पाच फूट रस्ता सोडून देण्यात यावा व संरक्षक भिंतीचे काम करण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते मात्र सकाळी 11 वाजता आंदोलन सुरू झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला या पावसातच शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग आंदोलन केले शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ससाणे आले होते त्यांना लेखी निवेदन दिल्यानंतर 15 दिवसात हा प्रश्न निकाले ना नेकलेस पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळ दिला आहे.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर उपनिरीक्षक अमोल ढाकणे यांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपसरपंच रवी पाटील चव्हाण,संजय पांडव,अजित पठाण, किशोर कोठारी,कैलास जाजू , सुनील पाखरे, अशोक सौदागर,लक्ष्मण मांडवगड , भगवान गाडे,चांगदेव मोरे, भगवान बनकर ,अजित ठोळे, गणेश कोकरे, विठ्ठल आघाडे, संतोष आघाडे ,गोरख लांडगे ,चंद्रभान कोकरे, रामचंद्र बडगे ,भिवसन बडोगे ,रमेश कोठारी, विलास सोनवणे, राम मोरे, रवी देशमुख ,सागर चव्हाण, कचरू श्रीखंडे रामराव श्रीखंडे ,जनार्दन शेळके ,नवनाथ मांडवगड, अशोकराव शेळके ,गणेश चव्हाण, नानासाहेब साखळी ,बाबू पठाण, सुनील शिरसाट, श्रीरंग वाकळे, बाळू चव्हाण, अण्णाराव चव्हाण ,किशोर मळेकर ,संतोष साखळी ,रामनाथ साखले,साईनाथ बनकर ,बाबासाहेब मोरे ,बबन बोराडे ,भगवान अजय साखले,काकासाहेब मांडवगड, रावसाहेब सोनवणे ,गणेश झगरे, संपतराव देशमुख, योगेश देशमुख, भैया देशमुख ,रवींद्र देशमुख, हरिदास कोकरे, शैलेश देशमुख ,सुधाकर आघाडे, सुधाकर चव्हाण ,आतिश चव्हाण ,गणेश मांडवगड ,सोपान चव्हाण, अजय कोकरे ,अजय शेलार ,अण्णा चव्हाण, कैलास आघाडे,चांगदेव चव्हाण आदि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया :- अशोक ससाणे (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने पाच फूट रस्ता शेतकऱ्यांना शेतात येण्या-जाण्यासाठी सोडावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्यांचे निवेदन स्वीकारले शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आले असून वरिष्ठ कार्यालयाकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल .