
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असत.पण मैत्री ही मानवी जीवनातचं आढळून येते;असं नाही प्राण्यांच्या विश्वासातही मैत्रीच्या अनेक कथा आहेत. असचं एक उदाहरण पहायला मिळालं अंजनगाव सुर्जी येथील पोलीस स्टेशन कार्यालयात!एक मोर जंगलाच्या दिशेने न जाता गावाच्या दिशेने उडत-उडत आला असता सुर्जीतील भीमनगर येथे चालू विजेच्या ताराचा धक्का त्या मोराला बसला असता तसाच तो खाली कोसळला.जखमी अवस्थेत मिळालेल्या मोराला विश्वास दामोदर इंगळे व शरद शंकरराव पळसपगार या दोन युवकांनी स्थानिक पोलीसांच्या स्वाधीन केले व पोलिसांनी त्याचे कौतुक केले.
सदर जखमी अवस्थेत मिळालेल्या मोराला पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय गणेश सपकाळ यांनी सदर मोराला ताब्यात घेऊन मानवतेचा धडा देत जखमी अवस्थेत मिळालेल्या मोरावर प्राथमिक उपचार केले.उपचारादरम्यान त्या मोराची व पी.एस.आय.सपकाळ ह्यांची घट्ट मैत्री जमली होती.परंतु या जगात सर्व प्राणीमात्रांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे असे पी.एस.आय सपकाळ यांनी म्हटले व जंगलात सुरक्षित ठिकाणी मोराला रितसर जीवनदान देण्यात आले.