
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
किनवट :- दशरथ आंबेकर किनवट दि. १० मार्च२०-२२ जिल्हा परिषद नविन प्रा.शाळा विठ्ठलवाडी बोधडी बु ता. किनवट येथील उपक्रमशिल शिक्षक श्री शांताराम श्रीरंग जायभाये यांना संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यातील असाधारण योगदानाप्रीत्यर्थ सन २०-२० चा जिल्हा शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड द्वारा दि.२७/०२/२०२२ रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री अशोकराव चव्हाण, जिल्हा अधिकारी श्री डॉ.विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जि.प.अध्यक्षा सौ मंगा राणी अंबूलगेकर , शिक्षण सभापती श्री संजय बेळगे यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला.
यावेळी त्यांना शाल, मानचिन्ह व प्रमाणपत्र , पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला .
श्री शांताराम जायभाये यांचे या पुरस्काराबद्दल शैक्षणिक व सामाजिक स्तरातून अभिनंदन करण्यात आले. किनवट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री अनिल कुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजय कराड,केंद्र प्रमुख श्री बाळासाहेब कदम, मुख्याध्यापक श्री गजानन मेंडके,श्री सुधाकर दहिफळे,श्री प्रकाश मुंडे,श्री किशन डोंगरे, श्री शिवराज मुंडे ,श्री श्याम केंद्रे ,प्राचार्य.श्री बालाजी केंद्रे, श्री प्रभाकर जमादार,श्री पांडुरंग खरोडे,श्री रमेश आंधळे, डॉ महेश जायभाये, डॉ विलास चाटे, रामदास गुट्टे,अॅड.उमाकांत केंद्रे, नितीन जाधव,राजीव दवणे ,सोपान लोखंडे , विष्णु मुसळे व बोधडी येथील मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.