
दैनिक चालु वार्ता
पुणे / प्रतिनिधी :- समाजातील रुढी, परंपरा, अंधश्रध्दा, वैद्यकीय सुविधांचा अभाव व वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे महिला आरोग्य दृष्ट्या जोखीम गटात मोडतात. मधुमेह रोगाचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याचे आढळून येते. तसेच स्त्रियांमधील कर्करोग ही सुध्दा एक सार्वजनिक आरोग्याची समस्या बनली आहे. ग्रामीण महिलांमध्ये रक्तक्षय नेहमीच आढळून येते. मधुमेह, कर्करोग, रक्तक्षय अशा असंसर्गजन्य आजारांबद्दल जनजागृती व्हावी व अशा संशयीत महिलांचे रोगनिदान होऊन त्यांच्यावर त्वरीत उपचार करता यावेत असा उद्देश ठेवून हा कार्यक्रम दर वर्षी राबवला जातो..
महिलांनी मासिक पाळीत काय काळजी घ्यावी व त्याचा आहार आणि विहार कसा असावा याबद्दल महिलांना माहिती देण्यात आली गर्भाशय मुखाचा कर्करोग हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे .सुमारे पुण्यात 500 महिला दर वर्षी ह्या रोगाला बळी पडत आहेत .वेळीच या कडे लक्ष दिले तर हा आजार 99 टक्के बरा करता येतो .या कर्करोगाची करणे व लक्षणे सांगून त्या साठी लागणारी तपासणी या बद्दल माहिती दिली.