
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
जळगाव जा. दि.११ :- स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व मैत्री या मुल्यावर आधारीत समाज निर्मितीसाठी तसेच मानवी मणाला निर्दोष जिवन जगण्यासाठी निब्बान स्थिती पर्यंत पोहचवीनारा तथागत बुद्धांचा सद्धम्म सर्वांना नीट समजावा, मानवी जीवन धम्म मार्गाने सुखी समृध्द व्हावे तद्वतच धम्माचा सुगंध सर्वत्र पसरावा आणि सध्दम्माचा प्रचार व प्रसार व्हावा व समाजातील युवा वर्ग हा चुकीच्या मार्गाने जात असून त्याला धम्म कळावा या उदात्त हेतुने जामोद येथे भारतीय बौद्ध महासभा ता -शाखा जळगाव (जा) यांचे विद्यमाने भव्य असे दहा दिवसीय बौध्दचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन दी- 1/3/2022 ते 10/3/2022 या कालावधीत करण्यात आले होते.
शीबिरात 30 शीबीरार्थि बसले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आयु. जगदीश हातेकर ता- अध्यक्ष जळगाव (जा) हे होते. पुज्य भंते दीपंकरजी चैत्यभुमी मुंबई यांनी सर्व शीबीरार्थिंना प्रवज्जा दीली, शिबिर प्रमुख म्हणून दहा दिवस आयु. ज्ञानोबा कांबळे यांनी शीबीरार्थि व गावातील बहुसंख्य नागरिक यांना आपल्या वानीतुन दहा दिवस धम्म सांगीतला. सुरूवातीला पुज्य भंते दीपंकरजी व मान्यवरांनी तथागत भगवान बुद्ध व बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमांचे धुप दीपाने पुजन करन्यात आले सर्व मान्यवरांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
आयु. जगदीश हातेकर यांना आयु. मीलींद वानखडे जि- संस्कार सचिन व आयुनी वीशाखाताई सावंग केंद्रीय शिक्षिका यांनी सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले व आयु. अरुण बाबन पारवे हे सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात त्यांचे कार्य हे वंदनीय असुन भारतीय बौद्ध महासभा ता-अध्यक्ष आद. जगदीश हातेकर व सर्व पदाधिकारी यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयु. एस. एस. वले सर सर जि- अध्यक्ष, सुरेश गव्हांदे जि- उपाध्यक्ष संस्कार विभाग, आयुनी छायाताई बांगर जि- उपाध्यक्षा महीला वीभाग, मीलींद वानखडे जि- सचिव संस्कार विभाग, मंगलाताई चापके सचिव महीला वीभाग, शेषराव वानखडे, भीमराव तायडे साहेब,मंगलाताई पारवे , प्रा. सुभाष सीरसाट, मधुकर गवई, देवानंद आठवले, वंदनाताई भगत, विठ्ठल तायडे, अनिल तायडे, परमेश्वर पारवे, संतोष इंगळे, प्रशांत अवसरमोल, सुशीलाताई पारवे,सुभाष शेगोकार , सुरेंद्र आठवले, ताईबाई सावळे, ललीताबाई शेगोकार, सुनीताबाई शेगोकार, माजी- ता- अध्यक्ष साहेबराव भगत, माजी- ता- अध्यक्ष एस. डी. झनके सर व आजु बाजुच्या परिसरातील सर्व महीला मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष सीरसाट यांनी केले तर प्रास्ताविक आयु. अनिल तायडे यांनी केले.कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह प्रसारण विनोद वानखडे इंडिया ईनहर्ट यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयु. अरुण पारवे व त्यांचा परीवार,धम्मपाल पारवे , समता सैनिक दलाचे जवान, समता क्रीडा मंडळ, रमाई महिला मंडळ, संघमीत्रा महीला मंडळ आम्रपाली महीला मंडळ, सुजाता महीला मंडळ, महामाया महीला मंडळ, समस्त जामोद येथील धम्म उपासक तथा उपासीका व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व ता- पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले. सरणत्तय घेउन कार्यक्रमाची सांगता करन्यात आली.