
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- मौजे ईरेगाव तालुका किनवट येथे दिनांक ५ मार्च ते १२ मार्च २०२२ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा भव्य काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर, गोपाळ महाराज मुरझळेकर, नारायण गरुड महाराज आळंदीकर प्रवचनकार ज्ञानेश्वर केसाळे, ह.भ.प. स्वामी भीमाशंकर महाराज पेंदेकर यांचा सात दिवशी धार्मिक कार्यक्रम,भजन कीर्तन रामकथा अखंड हरिनाम सप्ताह अशी धार्मिक कार्यक्रम दररोज सकाळ, दुपार,संध्याकाळ होणारआहेत तर शेवटी काल्याचे किर्तन,हरिभक्त पारायण माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्फत संपन्न होईल या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील गांवकरीवर्गाने घ्यावाअसेआव्हान मौजे ईरेगाव येथील गांवकरी व आयोजक च्या वतीने करण्यात आले आहे.