
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
अमरावती :- संत गाडगे बाबा यांची जन्मभूमी शेंडगाव,ता.अंजनगाव सुर्जी येथील तीर्थक्षेत्र विकास निधीचे काम सन २०२० मध्ये चालू झाले होते.चौकशीप्राप्तीनुसार सदर काम निधी अभावी बंद पडले अशी धक्कादायक माहिती समोर आली.पण या जगविख्यात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांची जन्मभूमी विकास काम निधी अभावी बंद पडत असेल तरीही अतिशय निंदनीय बाब आहे.फक्त नावापुरते थोर व संतांचे नाव राजकीय हेतू करीता वापरू नये.कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या जन्मभूमीचा पूर्ण विकास करावयाचा असेल तर त्वरित तीर्थक्षेत्राच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून काम चालू करावे.
ज्या थोर संताने शिक्षणाचा प्रचार -प्रसार केला,जनतेच्या मनातील अंधश्रद्धेचा व गावोगावी जावून साफ-सफाई केली अश्या संतांचे आपण सर्व राजकीय हेतू साध्य करतांना जनतेसमोर उघडपणे दिसत आहात यात काही शंका नाही.आज त्याच थोर संतांच्या जन्मभूमीतील विकासाकरिता आपल्याकडे निधी उपलब्ध होत नसेल तर एव्हढी गंभीरबाब कुठलीच नसेल… जर आठ दिवसाच्या आत काम सुरू न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू याची सदर संबंधीत विभागाने दखल घ्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे किरण साबळे,सार्थक जानोरकर व आदीं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.